महाराष्ट्र हा सहकारी चळवळीत देश पातळीवर स्वतंत्रपूर्व काळापासून अग्रेसर आहे. सद्यस्थितीत या सहकारी संस्थांची झालेली वाढ गुणात्मक व संख्यात्मक अशी दोन्ही पातळीवर दिसून येते. मा. डॉ. अतुल सुरेश भोसले (बाबा ) यांना लाभलेल्या सहकार वारश्यातून, त्यांचे सामाजिक विचारातून त्यांनी सहकार महर्षी मा. जयवंतराव भोसले (आप्पा) नागरी सहकारी पतसंस्था मर्या. कराड या संस्थेची स्थापना करणेचा निर्णय घेतला त्याप्रमाणे दि.२५ एप्रिल २००१ रोजी कराड येथे पतसंस्थेची स्थापना झाली.या संस्थेने व्यापक समाजहित हा उद्देश समोर ठेवून त्यासाठी लागणारी सृजनात्मक व सकारात्मक पावले संस्थेच्या प्रत्येक सदस्याने उचलल्या मुळे आज रोजी संस्थेने यशाचे शिखर गाठले आहे.